२४ तासाच्या आत चोरी करणारा सराईत आरोपीला बेड्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

२४ तासाच्या आत चोरी करणारा सराईत आरोपीला बेड्या

➡️ गोवंडी  पोलीस ठाणे 

गु र क्रमांक 52/2024 कलम 379 भा.द.वि.


➡️ घटनास्थळ :-- शॉप नं. ०५, उदय बिल्डींग, गोवंडी स्टेशन रोड, पूर्व, अर्जुन सेंटरच्या समोर, गोवंडी, मुंबई.


 ➡️ गुन्हा घडला दिनांक वेळ -

दि. 21/02/24 रोजी पहाटे 06:55 वा. ते 06: 58 वा. च्या दरम्यान


 ➡️ गुन्हा दाखल दिनांक वेळ - 

24/02/2024 रोजी 15:10 वा.


➡️ फिर्यादीचे नाव व पत्ता  :- अक्षय नित्यानंदस्वामी बडोला वय: ३१, धंदा:- व्यवसाय (लॉजिस्टिक), रा.ठी. रूम नं. ७०२, साईमोक्ष अपार्टमेंट, सेक्टर १५, खारघर, डी मार्टच्या जवळ, खारघर, नवी मुंबई.


 ➡️ हकीगत -

यातील नमूद  तारीख, वेळी व ठिकाणी एका अनोळखी इसमाने फिर्यादी यांच्या शॉप मध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश करून त्यांच्या मालकीचे एच पी कंपनीचा पॅव्हेलियन -360 मॉडेल, सिल्व्हर रंगाचा लॅपटॉप व डेल कंपनीचा डार्क ग्रे (गडद राखाडी) रंगाचे लॅपटॉप दोन लॅपटॉप चोरी केल्याचे दिसल्याने फिर्यादींनी आज रोजी पोलीस ठाण्यात येऊन अनोळखी इसमा विरोधात कायदेशीर कारवाई होणे कामी तक्रार असल्याचे सांगितल्याने फिर्यादींचा सविस्तर जबाब नोंद करून गुन्हा नोंद करण्यात आला.


➡️ चोरीस गेलेली मालमत्ता :-

1) अं.कि. २५,०००/- किंमतीचा जु. वा. एच.पी. कंपनीचा पॅव्हेलियन -३६० मॉडेल, सिल्व्हर रंगाचा लॅपटॉप*


2) अं.किं. १५,०००/- किंमतीचा जु.वा. डेल कंपनीचा डार्क ग्रे (गडद राखाडी) रंगाचा लॅपटॉप*


एकूण अं.कि. ४०,०००/- रूपये


➡️ हस्तगत मालमत्ता:- चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करीत आहोत


 ➡️ अटक आरोपी-

 1) शुभम नामदेव कोदे  वय 20 वर्षे, धंदा :- नाही. रा.ठी. डी मैदान, भाजी मार्केट जवळ , खरदेवनगर झोपडपट्टी, घाटला, चेंबूर, मुंबई. 400088.


➡️ अटक दिनांक :-

24/02/2024 - 19:01 वाजता


➡️ पूर्वभिलेख :- 

1) गोवंडी पोलिस ठाणे गु.र. क्र. 236/2023 कलम 452, 324, 323, 504, 506, 34 भा.द.वि.


➡️ गुन्ह्याचा तपास --

नमूद गुन्हा नोंद करून गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउपनि घोलप व पथक यांनी नमूद घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फुटेज मधील इसम हा गोवंडी पोलीस ठाण्याकडील अभिलेखा वरील आरोपी नामे शुभम नामदेव कोदे. असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नमूद अटक आरोपीचा त्याचे राहते घराच्या परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला. त्यास चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याची अनुषंगाने चौकशी केली असता त्याचा नमुद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे तंतोतंत पालन करून अटक करण्यात आली.  


➡️ तपासी अधिकारी-

पो. उपनिरीक्षक मुकेश घोलप.


➡️ गुन्हे प्रकटीकरण पथक :--

पो. उपनिरीक्षक मुकेश घोलप.

पो. ह. 970555/नागे.

पो शि 070741/ बागवान.

पो शि 091073/ केदार.

पो शि 111286/ माळवे.

पो शि 111960/ हेमाडे.


अशी माहिती गोवंडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांनी दिली आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज