भांडुप परिसरात दोन वाहनातून गांजाचा साठा येणार असल्याची खबर युनिट-५ ला मिळाली होती. त्यानुसार उपयुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक घनश्याम नायर, निरीक्षक येरेकर, गोंधळी, सपोनि माळी, जाधव, खेडकर व पथकाने भांडुप येथील ऐरोली नाका दिशेने जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून ती दोन्ही वाहने पोलिसांनी अडवली. त्या वाहनांची तपासणी केली असता त्यात ३७४ किलो गांजाचा साठा मिळून आला. या गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडल्यानंतर चौकशीत त्याने जळगाव येथील हा गांजा मुंबईत आणल्याचा व तो गांजा देणाऱ्या एका व्यापाऱ्याचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गोपाळ नेटलेकर, शरद पाटील, सुनील मोहिते अशा तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आता हा गांजा ते कुठल्या ठिकाणी कोणाला देणार होते त्याचा शोध पोलीस घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
0 टिप्पण्या