पतीला युपी, गाझीपुर येथून अटक
मुंबई, दि. ९ : पत्नीची हत्या करून पसार झालेल्या राजेश यादव याला गुन्हे शाखेने गाझिपूर भागातून अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयातून पत्नीचे गळा दाबून तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कांजूरमार्ग येथील नेहरूनगर परिसरात दोन महिन्यांपूर्वीच दीपा यादव (वय,व२२) पतीसोबत राहण्यास आली होती. मंगळवारी दीपा मृतदेह हातपाय बांधून बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत सापडली होती. तिचा पतीदेखील गायब असल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेच्या कक्ष -७ ने ही याचा समांतर तपास सुरू केला असता आरोपी गावी उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याच्या शक्यतेतून गुन्हे शाखेने त्याचे गावी जाऊन तपास केला. मात्र, आरोपी तेथे मिळून आला नाही.
आरोपी गाझीपूर भागात असल्याचे समजताच पथकाने तेथे धाव घेऊन त्याला अटक केली. आरोपी नशेच्या आहारी गेला होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने पत्नीचा गाळा आवळून हत्या केली होती. हत्येनंतर तो प्रसार झाला होता. ४ तारखेला शेवटचा तो कामावर गेला होता. त्यानंतर तो गायब होता. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा