मुंबई, दि. १० : लुटीच्या हेतूने उत्तरप्रदेशमध्ये डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करून मुंबईत पळून आलेल्या मंगेशकुमार संग्राम यादव (२२) या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष-९ ने गोरेगावमधून बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याजवळून एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. उत्तरप्रदेशच्या जलालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टराची गोळ्या घालून हत्या करणारा आरोपी पिस्तूलासह वांद्रे परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष नऊला मिळाली होती.
त्यानुसार कक्षाचे प्रमुख दया नायक यांच्या नेतृत्वातील पथकाने येथील रंगशारदा हॉटेलसमोर सापळा रचून यादवला ताब्यात घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा