दोन मोबाईल चोरांना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

demo-image

दोन मोबाईल चोरांना अटक

मुंबई, दि. ६ : मोबाईल सह बाईक चोरीच्या गुन्ह्यातील दोन जणांना जुहू पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे तर त्याचा सहकारी मोहसीन लीग अन्सारी उर्फ चिन्ना याला स्थानिक न्यालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 


त्या दोघांच्या अटकने तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यातील दोन बाईक आणि एक आयफोन असा १ लाख ३५,०००/- चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. २५ जानेवारीला रात्री साडेबारा वाजता भविष्य प्रकाश शिवानी हा तरुण जुहू तारा रोड येथून पायी जात होता. यावेळी बाईक वरून आलेल्या दोन तरुणांनी त्याचा ३० हजारांचा आयफोन चोरी करून पलायन केले होते. या प्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले.


%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%82%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%2005.%20Press%20Note-1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *