मुंबई, दि. ५ : अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा सक्रिय झालेल्या दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईची अंमली पदार्थविरोधी पक्षाच्या घाटकोपर युनिटने केली आहे.
या कारवाईदरम्यान आरोपीकडून ८७ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १७ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. हे दोन्ही आरोपी नायजेरियाचे असून यापूर्वी एकाला एमआरएम मार्ग पोलिसांनी तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तर दुसऱ्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. जामीनावर मुक्त झाल्यानंतर या दोघांनी गोरेगाव, वसई, विरार, नालासोपारा या परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्यास सुरुवात केली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा