सव्वादोन कोटी गोठविण्यात पोलिसांना यश
मुंबई, दि. २९ : इन्वेस्टमेंटच्या नावाखाली नागरकांची फसवणूक करणाऱ्या ३७ वर्षीय आरोपीला पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केताब अली काबिल बिस्वास असे आरोपीचे नाव असून तो सांताक्रुज मधील रहिवासी आहे. तपासादरम्यान ३३० बँक खात्यातील सव्वा दोन कोटी रुपये गोठविण्यास तपासी पथकाला यश आले आहे.
जोगेश्वरी पूर्व येथील नटवर नगर रोड परिसरात राहत असलेल्या फाकरुद्दीन बगसरावाला (वय, ७३) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार गेल्या वर्षी २० मे ते ७ ऑक्टोबर दरम्यान कला ऑनचिरा, स्टेला या दोन महिलांसह पॉल ट्युडोर नावाचा व्यक्ती आणि व्हाट्सअपच्या सिल्वर ग्रुप मधील अन्य सभासदांनी कट रचून त्याच्याकडून ऑनलाईन पैसे उकळण्यासाठी खोटे ऑनलाईन एग्रीमेंट बनवले. खोटे ऑनलाईन एग्रीमेंट बगसरवाला यांना पाठवत ते खरे असल्याचे भासवून त्यांच्याकडून गुंतवणूक करून घेतली.
गुंतवलेली रक्कम परत न देता बगसरवाला यांचे तीन कोटी ६१ लाख ७६ हजार ४२६ रुपयांची फसवणूक केली. बगसरवाला यांनी दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.
पोलिसांनी गुन्ह्यातील तांत्रिक पुरावांच्या आधारे तपास करत सांताक्रुज मधील रहिवासी बिस्वास याला ताब्यात घेतले. व्यवसायाने कपड्यांचा कारखाना चालवत असलेले विश्वास आणि फसवणूक केलेल्या तीन कोटी ६१ लाखांपैकी सव्वा दोन कोटी रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा