साकिनाका पोलिसांनी केले तीन आरोपींना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

साकिनाका पोलिसांनी केले तीन आरोपींना अटक

मुंबई, दि. १३ : दि.११/०२/२०२४ रोजी तक्रारदार सद्दाम हुसेन ईमामुददीन अन्सारी,वय-३२ वर्ष, धंदा-कापडावरील जरीकाम, रा.ठी.-कोल्हापुर इस्टेट, खान मेडीकल, यादव नगर खैराणी रोड, साकीनाका मुबई, यांचा लहान भाऊ नामे सुहेब उर्फ शोएब सुहेबुददीन ईमामुददीन अन्सारी, वय-२२ वर्ष हा दुपारी १२.०० वा च्या सुमारास दुपारच्या जेवण आणण्यासाठी गेले असताना दुपारी ०२.४१ वा. च्या सुमारास फिर्यादी यांचा लहान भाऊ नामे सुहेब उर्फ शोएब हा खैराणी रोड, एस.जे. स्टुडीओ समोरून चालत जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांशी सुहेबचा वाद झाला व नमुद वादात सदर अनोळखी इसमांनी तक्रारदार यांचा भाऊ सुहेब यास हाताने व पेव्हर ब्लॉकने मारहाण करून जबर जखमी केल्याने सुहेब हा रस्त्यावर बेशुदध अवस्थेत पडला होता. त्यानंतर सदर ठिकाणी उपस्थित लोकांनी फिर्यादी यांचा भाऊ सुहेब यास पॅरामाउंड हॉस्पिटल, साकीनाका येथे उपचाराकामी घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी सुहेब यास तपासुन दाखल पुर्व मयत घोषित केले. सबब फिर्यादी यांचा भाऊ सुहेब उर्फ शोएब सुहेबुददीन ईमामुददीन अन्सारी, वय- २२ वर्ष याच्या मृत्युस कारणीभुत ठरले म्हणुन ०3 अनोळखी इसमाविरूदूध फिर्यादी यांच्या तक्रारीवरून दि.११/०२/२०२४ रोजी २१:४९ वा. साकीनाका पोलीस ठाणे येथे गु.र.क. १८५/२०२४ कलम ३०२, ३४ भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


साकीनाका पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले गुन्हे प्रकटीकरण व निगराणी पथकात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी घटनास्थळी मिळालेल्या संशयीत इसमांचे वर्णन तसेच गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीती वरून तपास करून खान कंग्पाऊड, गोवंडी डंपिंग, शिवाजी नगर, मुबई येथुन आरोपी नामे

१) अनस इकरार अहमद शेख,वय-२१वर्ष, रा.ठी.-रूम नं.सी/१०मोहन चाळ, खैराणी रोड, साकीनाका मुबई,

२) गुल्फराज बिसमिल्ला खान,वय-२५ वर्ष, रा.ठी.-रूमनं.ई/१०मोहन चाळ, खैराणी रोड, साकीनाका मुबई,

३) अफजल सगीर अहमद सययद,वय-२४ वर्ष,रा.ठी.-रूमनं.बी/१९मोहन चाळ, खैराणी रोड, साकीनाका

मुबई यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांचा गुन्हयातील स्पष्ट सहभागावरून नमुद गुन्हयात अटक करण्यात आली.


अशाप्रकारे साकीनाका पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण व निगराणी पथकात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सदर गुन्ह्याचा उत्कृष्टरित्या तपास करून सदर गुन्हयाचे ०६ तासाच्या आत उकल करून आरोपीस अटक केले.


सदर यशस्वी कामगीरी मा. पोलीस, सह आयुक्त (का.व सु.), बृहन्मुंबई, श्री. सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्‍चिम प्रादेशिक विभाग, (बांद्रा) मुंबई श्री. परमजीत सिंह दहिया, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१०, मुंबई, श्री. दत्ता नलावडे, मा. सहायक पोलीस आयुक्त,साकीनाका विभाग श्री. भारतकूमार सुर्यवंशी, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. योगेश शिंदे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, साकीनाका पोलीस ठाणे, मुंबई, तथा पो.नि. (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संभाजी साबळे, पोउनि नांगरे, पोउनि कादे, पोउनि लोणकर, पोर्डाने ससाणे, गुन्हे प्रकटिकरण पथक व निगराणी पथक यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज