शिवाजीनगर येथील घटना; चौघांना अटक
मुंबई, दि. ३ : मुंबई : गोवंडीतील अमान शेख तरुणाच्या हत्येपाठोपाठ साक्षीदाराच्या जबाबातून आणखी एका हत्येचा उलगडा झाला आहे. कुर्ला मिठी नदीपात्रात महिन्याभरापूर्वी पोलिसांना अमानचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपीना अटक केली होती. या आरोपींनी अशाच प्रकारे चेंबूरमधील आणखीन एका तरुणाची हत्या करत मृतदेह कामोठे येथील खाडीत. फेकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी आणखीन एक गुन्हा नोंदवत तपास सुरूकेला आहे.
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून महिन्याभरापूर्वी अमान शेखची हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह कुर्ला मिठी नदीत फेकण्यात आला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. कुर्ला पोलिस आणि गुन्हे शाखा यांनी समांतर तपास करत यामध्ये नकीस खान,सकीर शेख, इमरान खान आणि अतिक मेमन या चौकडीला बेड्या ठोकल्या. यादरम्यान एका साक्षीदाराच्या जबाबातून यावेळी, चेंबूरच्या लोखंडे मार्ग परिसरात राहणाऱ्या कबीर इंद्रिसी याचीदेखील याच आरोपींनी हत्या केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
- आरोपीकडून ७० हजार रुपये घेतले कर्ज
कबीर इंद्रिसी हा नफीस खान याच्या रिक्षावर चालक म्हणून काम करत होता. त्याने आरोपीकडून ७० हजार रुपये कर्ज घेतले होते. पेसे परत न दिल्याने या आरोपीनी त्याला बोलावून रिक्षातून मुंबईच्या रस्त्यांवर फिरवत मारहाण करत हत्या केली. पुढे पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कामोठे येथील खाडीत फेकून दिला, याबाबत चौघांविरोधात गुव्हा दाखल केला आहे.
- त्यामुळे तक्रारीसाठी पुढे आली नाही
अमान शेखच्या हत्येपूर्वी ओरोपीनी कबीर इंद्रिसीची हत्या केली. मात्र, तो बऱ्याच महिन्यापासून गायब असताना त्याची कुठेही तक्रार नसल्यामुळे हे प्रकरण समोर आले नाही. याबाबत त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता, तो कामानिनित्त बाहेर गोला असावा, असा तिचा अंदाज होता. त्यामुळे तक्रारीसाठी पुढे आली नसल्याचे सांगितले.

Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा