मुंबई, दि. २ : गोवंडी पोलिसांनी मुंबईत विक्री करण्यासाठी आणण्यात आलेला तब्बल ८७ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी 3१ जानेवारीच्या रात्री नाकाबंदीदरम्यान ही कामगिरी करत राजस्थानमधील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबईत होत असलेली अमली पदार्थांची विक्री, तस्करीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी 3१ जानेवारीला शहरात एक विशेष मोहीम राबविली. यात पोलिस अभिलेखावरील 3०८ अमली पदार्थ तस्करांची तपासणी करण्यात आली. यात सापडलेल्या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. गांजाचे चार, कोकेन दोन आणि एमडी जवळ बाळगल्याप्रकरणी सात गुन्हे दाखल करून कोकेन घेऊन आलेल्या दोन विदेशी तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा