नऊ कोटींच्या कोकेनसह नायजेरियनला अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

demo-image

नऊ कोटींच्या कोकेनसह नायजेरियनला अटक

साकीनाका पोलिसांचे अलर्ट पेट्रोलिंग


मुंबई, दि. ८  : साकीनाका पोलिसांच्या अलर्ट पेट्रोलिंगमुळे एका नायरेजियन नागरिकाला ९ कोटी रुपयांच्या कोकेनसह पकडण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. पोटात ड्रग्स लपवून भारतात त्याची तस्करी करणाऱ्या त्याच्या परदेशी साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.


साकीनाका पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालत नायरेजियन ड्रग्ज तस्कराला पकडत त्याच्याकडून ८८० ग्रॅम वजनाचे कोकेन हस्तगत केले. ज्याची किंमत नऊ कोटी रुपये आहे. चौकशीत पोलिसांनी त्याचा सहकारी व पुरवठादार १९ वर्षीय व्हेनेझुएलाचा नागरिक यालाही अटक केली आहे. त्याने पोटात लपवून इथीओपीयामधून अंमली पदार्थांची तस्करी केली होती. दोन्ही परदेशी नागरिकांना अंमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक पदार्थ कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. परिमंडळ -१० चे पोलीस उपयुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


साकीनाका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र नगर, पंकज परदेशी आणि त्यांचे पथक रात्रीची गस्त घालत असताना त्यांना एक नायरिजन व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबायला सांगितल्यावर तो घाबरून पळू लागला. पोलीस पथकाने त्याला तात्काळ पकडले असता त्याचे नाव डॅनियल असे समजली त्याच्या अंग झडतीत ८८ प्लास्टिक कॅप्सूल सापडल्या. या कॅप्सूलमध्ये ८८० ग्रॅम उच्च दर्जाचे कोकेन भरलेले होते. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे ९ कोटी रुपये असल्याची माहिती नलावडे यांनी दिली. डॅनियलच्या चौकशी दरम्यान पोलिसांनी साकीनाका येथील एका हॉटेलमधून व्हेनेझुएलाचा नागरिक रामोस याला देखील अटक केली. 

%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%20SPL%2035@2024%20Press%20Note%20(1)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *