घरफोडीच्या गुन्हयातील आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, ७ जानेवारी, २०२४

demo-image

घरफोडीच्या गुन्हयातील आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत

मुंबई, दि. ७ : ओशिवरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक २४/१२/२३ रोजी फिर्यादी नामे श्री. केनेली हरिषकुमार दोषी यांची बहिण राहत असलेल्या ए क्लेट बिल्डींग, यमुनानगर, लोखंडवाला, अंधेरी पश्‍चिम, मुंबई येथील घरामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने अनधिकृतरित्या प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्‍कम चोरी केली आहे, अशी फिर्यादी यानी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २६/१२/२३ रोजी ओशिवरा पोलीस ठाणे येथे गु.र.क. १२९५/२०२३, कलम ४५४, ३८०, ५११ भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


सदर गुन्हयाच्या आजपावेतो केलेल्या तपासावरून सदरचा गुन्हा हा आरोपी १) मारुष मोहन मोटवानी वय ३९ वर्षे व २) प्रदिप नदूमल कुकरेजा वय ३६ वर्षे यांनी केला असल्याचे निष्पन झालेने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेली मालमत्ता १) ७०.०१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट किमंत रू. ३.१२,७६२/- २) ३१९.६१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रूपये १९,१७,६६०/- ३) ११००.५०० ग्रॅम वजनाचे चांदीच्या वस्तु किंमत रूपये ७७,०३५/- ४) ८२६.३७ ग्रॅम वजनाच्या सोने व चांदीचा मुलामा दिलेल्या वस्तु एकुण किंमत रूपये - ८,२५३/- असे एकूण २३,१५,५१० /- किंमतीचे दागिने व रोख रक्‍कम रु.२४,०००/- असे एकूण रुपये २३,४०,५१०/- ची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.


ओशिवरा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि श्री. आनंद नागराळ, पोलीस हवालदार श्री. शैलेश शिंदे, श्री. विनोद माने, श्री. सिराज मुजावर, पोलीस शिपाई श्री. उमेश सोयंके, श्री. नवनाथ गिते, श्री. अमोल सुतार, श्री. किशोर बोबडे, श्री. गणेश बोराटे, व श्री. गणेश हंचनाळे यंनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.

2351%20%E0%A4%93%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *