गुन्हे शाखा, मुंबई यांनी केले पाच गुन्हे उघड
मुंबई, दि. ६ : मस्जिद मध्ये पहाटे ७.०० वा फजर ची नमाज झाल्यानंतर तक्रारदार इमाम हे मस्जिद मध्ये आराम करत असताना आरोपी हा नमाजच्या बहाण्याने मस्जिद मध्ये प्रवेश करून तेथे इमाम/मौलाना यांचे मोबाईल व पैसे चोरी करत होता. अशाप्रकारे आरोपीने मुंबई, पुणे व कानपूर, राज्य उत्तप्रदेश येथील मस्जिद मध्ये मोबाईल व पैसे चोरी केल्याने अज्ञात इसमाविरूध्द वेगवेगळया पोलीस ठाणेस कलम ३८० भा. द.वि. अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते.
मागील काही दिवसात धारावी परिसरातील ४ वेगवेगळया मस्जिद मधील इमाम/मोलाना यांचे मोबाईल चोरी झाल्याने कक्ष-७ तर्फे सदर गुन्हयाचा समांतर तपास चालू करून कक्ष-७ येथील पथकाने मानवी कौशल्ये व तांत्रिक तपासाच्या आधारे यातील आरोपी व्यक्तीस सी.एस.एम.टी. रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले व त्याच्याकडून चोरी केलेले ७ मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करून खालील नमूद ५ गुन्हे उघडकीस आणण्यास कक्ष-७ कार्यालयास यश प्राप्त झाले आहे. आरोपी हा कानपूर, राज्य उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे. आरोपी चोरी करण्याकरीता मुंबई व पुणे येथे येत असून त्याने मुंबई, पुणे व त्याचे मूळगाव कानपूर येथील वेगवेगळया मस्ज्दि मध्ये चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
उघडकीस आणलेल्या गुन्हयांची माहिती पुढीलप्रमाणे
१) धारावी पोलीस ठाणे गु.र.क्र. ६००/२३ कलम ३८० भा.द.वि.
२) धारावी पोलीस ठाणे गु.र.क्र. १०/२४ कलम ३८० भा.द.वि.
३) शाहूनगर पोलीस ठाणे गु.र.क्र. ०0६/२४ कलम ३८० भा.द.वि.
४) डोंगरी पोलीस ठाणे गु.र.क्र. १२/२४ कलम ३८० भा.द.वि.
५) चमनगंज पोलीस ठाणे, कानपूर, उत्तरप्रदेश गु.र.क्र. कलम ३८० भा.द.वि
पुरूष इसम, वय २९ वर्षे, रा.ठि. छोरी मोहल्ला, कर्नल गंज, कानपूर, राज्य उत्तरप्रदेश असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, मुंबई, श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, मुंबई, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई, श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुकत (गुन्हे) श्री. शशीकुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), श्री. राज तिलक रौशन, मा. सहा. पो. आयुक्त (मध्य), श्री. दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ७ चे प्र.पो.नि. घनश्याम नायर, स.पो.नि. अमोल माळी, स.पो.उ.नि. अंकुश न्यायनिर्गुणे, पो.ह. नितेश विचारे, पो.ह. तानाजी पाटील, पो.शि. सरफरोज मुलाणी, पो.शि. युवराज सावंत, पो.शि. प्रमोद पाटील आणि पो.ह.चा. हरेश कांबळे व पो.शि.चा. शुभम सांवत यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा