किंमती हिऱ्यांच्याऐवजी दगड मारले माथी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

demo-image

किंमती हिऱ्यांच्याऐवजी दगड मारले माथी

मुंबई, दि. ३ : विविध रंगांचे व आकारांचे नीलम, रुबी, पुष्कराज, ओपल आदी हिऱ्यांसारखे दिसणाऱ्या खड्यांच्या नावाने नागरिकांना दगड धोंडे विकणाऱ्या सहा जणांच्या टोळीला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. कोट्यावधी किंमत सांगून हे चोरटे नागरिकांच्या गळ्यात पद्धतशीरपणे मार्बलचे दगड मारत असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी काही खडे जप्त केले आहेत.
2350_3

खडे विकण्याच्या पाहण्याने सामान्य नागरिकांची फसवणूक करणारी टोळी दादर परिसरात फिरत असल्याचे माहिती उपयुक्त प्रशांत कदम यांना मिळाली होती. त्यानुसार कदम, वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आण्णासाहेब गाडेकर व पथकाने दादर पूर्वेकडे स्वामीनारायण मंदिर परिसरात महागडे खडे विकण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. दरम्यान सहा जणांची टोळी त्या ठिकाणी येतात पोलिसांना त्यांना रंगेहाथ पकडले. संजूर खान, जितेंद्र कुमार ब्राह्मण, प्रकाश टेलर, शैलेश चव्हाण, भालचंद्र आणि इरफान शेख अशी त्या सहा जणांची नावे आहेत व त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. 
2350_1

2350_2

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *