मुंबई, दि. ४ : भारतीय प्रशासकीय सेवेतील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला पोलीस महासंचालक मिळाल्या आहेत.
रजनीश शेठ हे ३१ डिसेंबर निवृत्त झाल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर चार दिवसांनी सरकारने रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. राज्यात सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा