घरफोडी करणा-या आरोपीतांना अटक करून मालमत्ता हस्तगत केलेबाबत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

demo-image

घरफोडी करणा-या आरोपीतांना अटक करून मालमत्ता हस्तगत केलेबाबत

चोरीचा माल पोलिसांकडून हस्तगत


मुंबई, दि. २२ :  दिनांक २७/०६/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता ते दिनांक २७/०६/२०२३ रोजी रात्री २०.३० वाजता दरम्यान तक्रारदार श्री शब्बीर अब्दुल शाहीवाला, वय ५६ वर्षे यांचे पंचमार्ग, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी - पश्‍चिम, मुंबई येथील राहते घरात कोणातरी अज्ञात इसमाने खिडकी उघडुन प्रवेश करून सोन्याचे दागिणे व रोख रक्‍कम एकूण ११,७५७,०००/- रूपये किंमतीची मालमत्ता चोरी केली आहे, अशी तक्रार फिर्यादी यांनी दिलेने दिनांक २९/०६/२०२३ रोजी वर्सोवा पोलीस पोलीस ठाणे येथे गु. र. क्र. २४५/२०२३ कलम ४५४, ४५७, ३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


सदर गुन्हयांच्या आजपावेतो केलेल्या तपासावरून आरोपी १) संजू देबू सरकार, वय २३ वर्षे यांने चोरी करून सोन्याचे दागिने आरोपी २) तेजस तानाजी कदम, वय २६ वर्षे यांचे मार्फतीने आरोपी ३) दिपक राधाकिशन पालीवाल, वय ३२ वर्षे यास विकले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून आरोपींकडून चोरी केलेले १४० ग्रम सोने अंदाजे किंमत ४,७५,०००/- रूपये हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास चालू आहे.


वर्सोवा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री. ज्ञानेश्‍वर जाधव, पो.ह.श्री. पांडुरंग पवार, पो.शि. श्री.तुषार भोसले, पो.शि. श्री.नसरूद्दीन इनामदार, पो.शि. श्री. देविदास साबळे, पो.शि. श्री. अमोल घाडगे, तांत्रिक मदत पो.ना. श्री. गणेश हंचनाळे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.

2384%20%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80,%20%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *