मुंबई, दि. २१ : अंधेरी येथून घातक शस्त्रांसह दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. प्रशांत राजोरिया ऊर्फ राधेभाई आणि हर्ष कश्यप अशी या दोघांची नावे असून ते उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे रहिवासी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी चार देशी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझीन आणि आठ राऊंड जप्त केले. अंधेरी परिसरात काही तरुण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
प्राप्त माहितीनुसार, सहायक पोलिस आयुक्त महेश देसाई, दिपक सावंत यांच्या पथकातील धनराज चौधरी, धारगळकर, धनवडे, चिकणे, ठोंबरे, डफळे, जगताप यांनी मरोळ येथील मकवाना रोडच्या वसंत ओएसीस टॉवरजवळील बोरोसील प्लॉटसमोर साध्या वेशात पाळत ठेवली. शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजता तिथे दोन तरुण आले. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेत घातक शस्त्रे सापडली. अटकेनंतर
दोघांनाही शनिवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा