तराज्यीय टोळीस अटक करून मालमत्ता हस्तगत
मुंबई, दि. २० : दिनांक १३/०१/२०२४ रोजी सांयकाळी ०६ वाजता दरम्यान तक्रारदार आदित्य ईश्वरदास रासीवारीया वय ४० वर्षे हे त्यांची मर्सिडीस कार क्र. WB-12-C-3223 याने चालकासह लिंक रोड येथे आले होते.
चालकास कारमध्ये थांबवून ते शॉपींग करण्यास गेले असता कार चालकास एका इसमाने रोडवर १०-२० रूपयांचे नोट पडली असल्याचे सांगून कार पुढे घेण्यास सांगितले, सदर दरम्यान कारमध्ये ठेवलेला सॅमसंग टॅब, ओमेगा कंपनीचे सोन्याचे घडयाळ, पासपोर्ट व इतर वस्तू असे एकूण १०,१७,०००/-रूपयांचे साहीत्य असलेली बॅग कोणीतरी चोरी केली आहे, अशी तक्रार त्यांनी दिली असता दिनांक १३/०१/२४ रोजी खार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्र. ३८/२४ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
त्याचप्रमाणे त्याच दिवशी श्रीमती तन्वी दिलीप खैरनार वय ३१ वर्षे यांच्या लिंक रोड लगत, रोड नं २४ खार पश्चिम, मुंबई येथे पार्क केलेल्या किया कार क्र MH-04-LH-5098 ची मागील दरवाज्याची काच फोडून कोणीतरी अज्ञात इसमाने कारमध्ये ठेवलेली एच पी कंपनीचा लॅपटॉप कि. अंदाजे रु. ५०,०००/- असलेली बॅग चोरी केली आहे, अशी श्रीमती तन्वी दिलीप खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून खार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्र. ३९/२४ कलम ३७९,४२७, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयांच्या केलेल्या तपासावरून सदरचे गुन्हे हे आरोपी १) गणशेखर उमानाथ वय २७ वर्षे, २) गोपाल चंद्रशेखर वय ४२ वर्षे, ३3) विजयन सुकुमार वय ३४ वर्षे सर्व राहणार तिरूचिल्लापल्ली, तामिळनाडू यांनी त्यांचे इतर साथीदारासह केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून अटक आरोपींकडून दोन्ही गुन्हयातील एकूण १०, ६५,०००/-रूपयांची (१०० टक्के) मालमत्ता तसेच या व्यतिरिक्त ५ लपटॉप व ८ मोबाईल फोन्स अंदाजे किंमत ३,८०,०००/- रूपय असे एकूण १४,४५,०००/-रूपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहेत. सदर गुन्हयांचा पुढील तपास चालू आहे.
खार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि श्री अविनाश नडविनकेरी, पोउपनि श्री. भरत सातपुते, पोउपनि श्री. भिमराव धापटे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार सर्व श्री. दिनेश शिर्के, आनंद निकम, योगेश तोरणे, अजित जाधव, मारूती गळवे, केदारनाथ शिंदे व मनोज हांडगे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.
0 टिप्पण्या