मुंबई, दि. १९ : कुठलीही कागदपत्रे न देता फक्त दोन हजार रुपयांमध्ये बनावट आधार कार्ड तसेच जुन्या आधार कार्ड मधील बदल करून देणाऱ्या सेंटरचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने बनावट कागदपत्रे तयार करण्यात या तिघांना भेबेड्याटा ठोकल्या आहेत. मेहफुज अहमद खान, रेहान शहाआलम खान, अमन कृष्णा पांडे अशी आरोपींची नावे आहेत.
गोवंडीतील 'रझा इंटरप्राइजे'स सह दोन सेंटरमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे आधार कार्ड बनवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष -६ च्या पथकाला मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी बोगस ग्राहक म्हणून एका महिलेला तेथे पाठवण्यात आले. दोन हजार रुपयांत कुठलेही कागदपत्रे न घेता जुन्या आधार कार्ड मध्येच महिलेला बदल करून दिला. हे समजताच गुन्हे शाखेच्या कक्ष -६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्या सेंटरवर धाड टाकली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तिघांना अटक करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा