ट्रॉम्बे येथून ८ बंदुका १५ काडतुसे जप्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, १८ जानेवारी, २०२४

demo-image

ट्रॉम्बे येथून ८ बंदुका १५ काडतुसे जप्त

शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्यास अटक

१८-१-२०२४

मुंबई, दादासाहेब येंधे : ट्रॉम्बे पोलिसांनी शस्त्रसाठ्याची विक्री करणाऱ्या एक सराईत तस्कराला मानखुर्द येथून बेड्या ठोकल्या आहेत. तपासात त्याच्या एका साथीदाराला देखील पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ८ बंदुका आणि १५ जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे.

Trombe%20police

मानखुर्द येथे एकजण मोठ्या प्रमाणात शस्त्रे विक्रीसाठी येणार असल्याची कुणकुण  ट्रॉम्बे पोलिसांना लागली होती. त्यानुसार  ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक शरद नाणेकर, अजय गोल्हार व पथकाने आवश्यक माहिती गोळा करून महाराष्ट्र नगर परिसरात सापळा रचून चेतन माळी (वय, २६) याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ४ पिस्तुले व ८ जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्याचे बोरवली येथे राहणाऱ्या सिनू पडीगेला (वय, ४८) याच्यासोबत शस्त्रास्त्रांविषयी संभाषण झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी बोरवली येथे जाऊन सिनू पडीगेला याला देखील अटक केली. त्याच्याजवळ एक पिस्तूल आढळून आले.


चेतन माळी असे आरोपीचे नाव असून कल्याण येथील घरातदेखील शस्त्रसाठा असल्याची त्याने पोलिसांना कबुली  दिली. त्याच्या घरातून तीन पिस्तुल हस्तगत केल्या. त्याने सेलू पडीगेला यालाही बंदूक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.


चेतन हा गेल्या वर्षभरापासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करीत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तो कोणाकडून शस्त्रे घेतो आणि कोणाला विकतो याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Press%20Note%20Trombay%20Fire%20Arm(1)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *