मुंबईत ९२ गुन्हे, ५७ जणांना बेड्या
मुंबई, दि. १७ : मकर संक्रांतीच्या अनुषंगाने नायलॉन मांजाचा वापर टाळण्यासाठी २५ डिसेंबर पासून मुंबईत पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली होती. त्यानंतर नायलॉन मांजा वापरल्या प्रकरणी ९२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत ५७ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असल्यामुळे २५ डिसेंबर पासून नायलॉन मांजाच्या वापराविरोधात विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती. या मोहिमेत १५ जानेवारीपर्यंत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ९२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ५७ जणांना अटक करण्यात आली असून या कारवाईत एक लाख ४३ हजार २४० किमतीचा नायलॉन मांजा देखील जप्त करण्यात आला आहे. १२ डिसेंबरला पश्चिम द्रुतगती मार्गावर नायलॉनच्या मांज्यामुळे समीर जाधव या पोलिस हवालदाराचा देखील मृत्यू झाला होता. ते दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कर्तव्य उरकून घरी परतत असताना मांज्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा