एक कोटी १७ लाखांचे एमडी जप्त
मुंबई, दि. १४ : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी घरातच एमडी या अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना सुरू केल्याची माहिती मालवणी पोलिसांच्या कारवाईत समोर आली आहे.
अब्बार इब्राहिम शेख (वय, ३०) नूर आलम मोहम्मद अलम चौधरी (वय, २४) अशी अटक केलेला आरोपींची नावे आहेत. ५ जानेवारीला मालवणी पोलीस ठाण्याच्या दक्षता पथकाने शेख यास अटक केली होती. त्याच्याकडून १ ग्रॅम एमडी व १०० थिनरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. चौकशीत जप्त केलेले एम.डी चौधरी कडून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारोती शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंखे यांच्या पथकाने ९ जानेवारीला चौधरी याचा शोध घेण्यासाठी कांदिवलीतील चारकोप इस्लाम कंपाऊंड येथे छापा टाकला. त्यावेळी नूर आलम मोहम्मद आलम चौधरी हा एमडी बनवताना आढळून आला.
नूर आलमने स्वतः एका खोलीतच एमडी बनवण्याचे काम सुरू केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याच्या १० बाय १० फुटांच्या खोलीत छापा टाकून एमडी तयार करण्याचे साहित्य, कच्चा माल आणि तयार करण्यात आलेले ५०० ग्रॅम शुद्ध एमडी हा पदार्थ जप्त केला.

नूर आलम याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याने बी एच एम एस ला नुकताच प्रवेश घेतला होता. पोलिसांनी त्याच्या एका खोलीतून एक पुस्तक देखील जप्त केले आहे. या पुस्तकात एमडीचा फॉर्मुला आणि तयार करण्याची पद्धत देण्यात आली होती.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा