गुन्हे शाखेची धकड कारवाई, ४ जणांना अटक
मुंबई, दि. १३ : मुंबईत अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हे शाखेची धडक कारवाई सुरू असून पुणे शाखेने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर सव्वा नऊ कोटींचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती कक्ष-९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळताच त्यांच्या नेतृत्वात कक्ष नऊच्या पथकाने सापळा रचला. डी एन नगर परिसरातून गुटख्याची अवैध वाहकतुक करत असलेला एक ट्रक ताब्यात घेतला. या कारवाईत गुन्हे शाखेने एकूण १ कोटी ६ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. पालघरच्या कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकूण चार मोठे ट्रक भरून प्रतिबंधित गुटखा नुकताच जप्त करण्यात आला आहे या चार ट्रकमध्ये एकूण ४०० मोठ्या गोण्यांमध्ये ४०० हजार छोट्या गोण्या भरून गुटखा पॅक करण्यात आला होता. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ९ कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. चारही ट्रक गुन्हे शाखेने जप्त केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा