मुंबई, दि. १२ : कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या २० दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याची घटना पोलिसांना मिळताच त्यांनी अवघ्या सहा तासात त्या बाळाची सुखरूप सुटका करत अपहरणकर्त्या महिलेला अटक केली आहे.
कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० जानेवारीला बाळाची आई रिंकी जयस्वाल त्याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात घेऊन गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा नवरादेखील होता. तो केस पेपर काढावयास गेला असता त्याचा फायदा आरोपी महिलेने घेत तिच्याशी गोड बोलून मैत्री केली. तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिने बाळाला स्वतःच्या हातात घेत रुग्णालयात फिरायला सुरुवात केली. काही वेळाने 'तू दमली आहेस, थोडी फ्रेश हो! असे तिने रिंकीला सांगितले. रिंकीने तिच्यावर विश्वास ठेवला आणि ती स्वच्छतागृहात गेली. तेव्हा आरोपी महिला बाळाला घेऊन पसार झाली. ही बाब लक्षात आल्यावर बाळाच्या पालकांनी कांदिवली पोलिसांनी धाव घेतली.
परिमंडळ-११ चे पोलीस उपायुक्त अजय कुमार बंसल, कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहन कदम, हेमंत गीते आणि पथकाने घटकास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले असता अपहरणकर्ती महिला त्यात दिसून आली. तिच्याकडे विचारपूस केली असता तिनेच ते बाळ चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा