Ticker

6/recent/ticker-posts

१९३० या सायबर हेल्पलाइनमुळे मिळाले २६ कोटी

मुंबई, दि. ११ : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या सायबर ठगांच्या आमिषाला बळी पडून साडेचार कोटी रुपये गमावलेल्या एका व्यक्तीने तात्काळ सायबर पोलिसांच्या हेल्पलाइनला कॉल केला आणि त्याने गमावलेल्या रकमेतील ३.७० कोटी रुपये ४८ तासांत वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. अशाच प्रकारे मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने गेल्या वर्षभरात हेल्पलाइन च्या मदतीने २६ कोटी ४८ लाख परत मिळवून दिले आहेत.


मुंबई शहरातील नागरिकांचे सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेली रक्कम संबंधित बँक खात्यांमध्ये गोठवण्यासाठी मुंबई गुन्हे शाखा अंतर्गत १९३० हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे.


याद्वारे सायबर गुन्ह्यात हस्तांतरित झालेली रक्कम तात्काळ गोठवण्याचे काम करण्यात येते. अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेल्या नागरिकांचे गेल्या वर्षभरात २६ कोटी ४८ लाख २२ हजार रुपये १९३० या हेल्पलाइनच्या माध्यमातून विविध बँक खात्यात गोठविण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला यश आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या