Ticker

6/recent/ticker-posts

थर्टी फर्स्ट नाईटला तळीराम गाड्या चालवताना सापडले

मुंबई, दि. १ : नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला दिनांक ३१/१२/२०२३ रोजी व दिनांक ०१/०१/२०२४ च्या पहाटे सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्यासाठी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर वेळी मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हदूदीमध्ये चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता.

मा. पोलीस आयुकत श्री. विवेक फणसळकर व मा. विशेष पोलीस आयुक्‍त श्री. देवेन भारती व पोलीस सह आयुक्त (का. व सु.) श्री. सत्यनारायण चौधरी यांनी शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देवून मार्गदर्शन केले. सदरवेळी शहरातील सर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्‍त विशेष शाखा, अपर पोलीस आयुक्‍त, संरक्षण व सुरक्षा, २२ पोलीस उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिठ पोलीस निरीक्षक, ४५० पोलीस निरीक्षक, १६०१ इतर अधिकारी व ११५०० पोलीस अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला चोख बंदोबस्त करुन कुठलाही अनुवित प्रकार होवू दिला नाही.


सदर बंदोबस्ता दरम्यान सर्व पोलीस ठाणे हदूदीत ११२ ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयेजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण ९०२५ दुचाकी /तीनचाकी /चार चाकी व इतर वाहानांची तपासणी करण्यात आली. सदर तपासणी दरम्यान विना हेल्मेट वाहन चालवणार्‍या एकूण २४१०, विरूध्द दिशेने वाहन चालवणार्‍या एकुण ३२० व बेदरकारपणे वाहन चालवणार्‍या (रॅश ड्राइविंग) एकुण ८० वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली. तसेच मद्यधुंद अवस्थेत (ड्रक & ड्राईव्ह) वाहन चालवणाऱ्या एकूण २२९ मद्यपी वाहन चालकांवर कलम १८५ मोटार वाहन कायदा अन्वये कारवाया करण्यात आल्या. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने मर्मस्थळे व संवेदनशिल ठिकाणे अशा एकुण ६१८ ठिकाणी तपासणी करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणे, गर्दीचे ठिकाणे, समुद्र किनारे व विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या