मुंबई, दि. २६ : साडेसात हजार टन वजनाचे आणि १६४ मीटर लांबीची महाकाय आयएनएस 'इम्फाळ' युद्धनौका मंगळवारी नौदला दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही अत्याधुनिक युद्धनौका मुंबईत डॉकयार्ड येथे नौदलाला सुपूर्द केली. ही युद्धनौका जमिनीवरून थेट मारा करणारी ८ क्षेपणास्त्रे आणि १६ ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल, सर्विलान्स रडार, ७६ एमएम रॅपिड माउंट गन आणि अँटी सबमरीन टॉपपिडोने सज्ज असून ती नौदलाच्या वेस्टर्न कमांड मध्ये सामील होणार आहे.

0 टिप्पण्या