Ticker

6/recent/ticker-posts

०९ महिन्यापासुन तपासाधीन असलेल्या जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीतास अटक

 मेघवाडी पोलीस ठाणेची उत्कृष्ट कामगिरी 


मुंबई, दि. १८ : फिर्यादी हे दिनांक ०८/०२/२०२३ रोजी सकाळी १०.२५ वा. पंजाब नॅशनल बँक शाखा, गोरेगाव पूर्व येथे जाण्यासाठी बेस्ट बस क्रमांक ५२३ मध्ये रामवाडी बस स्टॉप वरून बसले. नमूद बस प्रतापनगर बस्‌ स्टॉपवर, जोगेश्‍वरी पूर्व, मुंबई येथे थांबवण्यासाठी बस चालकाने ब्रेक लावला असता, फिर्यादींचा तोल पुढे गेला त्यावेळी कोणीतरी अनोळखी इसमाने त्यांच्याकडील रोख रू. १,८६,०००/- आणि अन्य दस्ताऐवज असले बॅग जबरीने खेचून चोरी केली व बसमधून उतरून पळून गेला. फिर्यादी यांनी अनोळखी इसमाच्या विरोधात तक्रार दिल्याने मेघवाडी पोलीस ठाणे गु.र.क्र. ५४/२०२३ कलम ३५२ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा करण्यात आला आहे.


सदर गुन्हयातील आरोपी आणि जबरीने चोरी केलेली मालमत्ता यांचा शोध लावण्याकरीता तपासी अधिकारी पो.उ.नि. मनोज भोसले यांनी गुन्हा नोंद केल्यापासून तपासात सातत्य ठेऊन गुन्हयाचा तपास केला परंतु आरोपींचा सुगावा लागत नव्हता. तांत्रिक व गुप्त बातमीदारांमाफत नमुद गुन्हयाचा तपास सातत्याने चालु असताना संशयित आरोपी नामे सुंदर मोसेस पिटर, वय ४० वर्षे हा गोपाल कृष्णा हॉटेल, जेबी नगर, मेट्रो स्टेशन खाली, अंधेरी पूर्व येथे दि. १३/१२/२०२३ रोजी येणार असल्याची विश्‍वसनीय माहिती पथकास प्राप्त झाली त्यानुसार पथकाने तेथे गुप्तपणे सापळा स्चला असता आरोपी तेथे आढळून आल्याने त्यास घेराव घालून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीतास पोलीस ठाणेस आणून अधिक तपास केला असता त्याचा सदर गुन्हयात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्मन्न झाले. आरोपीकडे अधिक सखोल तपास केला असता त्याने त्याच्या अन्य ०५ साथीदारांसह सदर गुन्हा केला असल्याची माहिती दिली. आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ साकीविहार रोड, गौतम नगर, पवई मुंबई येथे सापळा रचून अन्य दोन आरोपी नामे (२) हरिराम रघुवीर भगत, वय ३३ वर्षे आणि (३) अशरफ सुलेमान मुल्ला, वय ४२ वर्षे यांना ताब्यात घेतले. सदर आरोपींना पोलीस ठाणेस आणून अधिक चौकशी केली असता त्यांचाही सदर गुन्हयात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निग्नन्न झाले. तसेच नमूद गुन्हयात अन्य काही आरोपींचा सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


नमूद आरोपी अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यांचा पूर्व गुन्हे अभिलेख खालीलप्रमाणे आहे.

१) आरोपी नामे सुंदर मोसेस पीटर, वय ४० वर्षे

१) पंतनगर पोलीस ठाणे गु.र.कृ. २०/१०, कलम ३८० भा.द.वि.

२) पवई पोलीस ठाणे गु.र.कृ. १६५/१०, कलम ३३८ भा.द.वि.

३) जे.जे.मार्ग पोलीस ठाणे गु.र.कृ. ०३/११ कलम ३५ भा.द.वि.

४) घाटकोपर पोलीस ठाणे गु.र.क.'9५/१२ कलम ३७५ भा.द.वि.

५) ओशिवारा पोलीस ठाणे गु.र.कृ. ११९५/ २०२१ कलम ३७९, ३४ भादवि

६) मेघवाडी पोलीस ठाणे गु.र.कृ. ५४/ २३ कलम ३५२, ३४ भा.द.वि.


२) आरोपी नामे मोहम्मद अशरफ सुलेमान मुल्ला, वय ४२ वर्षे

१) भोईवाडा पोलीस ठाणे गु.र.कृ.२२८/११, कलम ३9५, ३४ भा.द.वि.

२) व्हि.पी.रोड पोलीस ठाणे गु.र.कृ. ६४७/ २१, कलम ३७५ भा.द.वि.

३) ओशिवारा पोलीस ठाणे गु.र.कृ. ११५/ २०२१ कलम ३७५, ३४ भादवि

४) मेघवाडी पोलीस ठाणे गु.र.कृ. ५४/२३ कलम ३५२, ३४ भा.द.वि.


३) आरोपी नामे हरिराम रघुवीर भगत, वय ३३ वर्षे

१) पवई पोलीस ठाणे गु.र.कृ. १८/११, कलम ४५२, ३४,३२४,

३२३,४२७, ५०४, ५०६(२) भा.द.वि.

२) ओशिवारा पोलीस ठाणे गु.र.कृ. ११५/ २०२१ कलम ३७५, ३४ भादवि

३) मेघवाडी पोलीस ठाणे गु.र.कृ. ५४/ २३ कलम ३५२, ३४ भा.द.वि.


मेघवाडी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार यांनी ०९ महिने तपासाधीन असलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन जबरी चोरीची मालमत्ता हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी ब॒जावली आहे.


सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त (का व सु) श्री. सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुकत, पश्‍चिम प्रादेशिक विभाग श्री परमजित सिंह दहिया, मा. पोलीस उप आयुकत, श्री दत्ता नलावडे, परिमंडळ १०, मुंबई मा. सहा. पोलीस आयुक्‍त मेघवाडी विभाग श्री. विनायक मेर, यांचे मार्गदर्शनाखाली मेघवाडी पोलीस ठाणेचे प्रभारी वरिठठ पोलीस निरीक्षक श्री. विजय साळुंके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रशांत भरते यांचे प्रत्यक्ष देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि. मनोज भोसले, पो.ह.क्र. ०१०३६/राजेश ठाकूर, पो.शि.क्र. ११११३'9/विजय पाटील, पो.शि.क्र.११०८२८/नंरेश वरठा आणि पो.शि.क्र. ०८०३२८/जमीर शेख, पो.शि.क्र. १११५'७७/इंद्रजीत सुरवसे, तांत्रिक मदत पो.ह.क्र. ०६०६५०/विशाल पिसाळ यांच्या मदतीने पार पाडली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या