मुंबई, दि. १७ : मुलूंड येथे रहाणारे एक फळ व्यापारी यांना दिनांक 0४/१२/२०२३ रोजी त्यांच्या मोबाईल फोनवर अनोळखी आरोपी यांनी त्यांचा मो.क. ९१५२४५०४०५ वरुन कॉल करुन जीवे ठार मारण्याची धमकी देवून रु. १५ लाखाची खंडणी मागितलेबाबत त्यांच्या तकारीवरुन नवघर पोलीस ठाणे येथे दिनांक ११/१२/२०२३ रोजी गु.र.क्र. २४६/२०२३, कलम ३८७ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेकडून समांतर तपासातंर्गत तांत्रिक बाबीच्या आधारे व गुप्त बातमीदार यांचेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मालमत्ता कक्षाच्या पथकाने डोंबिवली रेतीबंदर परिसरात शोध मोहिम राबवून गुन्हयातील मुख्य आरोपीस ताब्यात घेवून त्याच्याकडून गुन्हयात वापरलेला मोबाईल हस्तगत केला. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने गुन्हा कबुल करुन मुलुंड येथे राहणाऱ्या त्याच्या साथीदाराबाबत माहिती दिल्यावरुन सदर दुसऱ्या आरोपीसही मुलुंड येथून ताब्यात घेण्यात आले व गुन्हा उघडकीस आणण्यात आला. सदर आरोपी क. 0१ व 0२ यांना पुढील तपासकामी जप्त मालमत्तेसह नवघर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुकत श्री विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुकत श्री देवेन भारती, मा. पोलीस सह आयुकत (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुकक्त(गुन्हे) श्री शशि कुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री राज तिलक रैशन यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयकुत (डी विशेष) श्री. दत्तात्रय नाळे यांच्या निगराणीखाली मालमत्ता कक्ष, गु.प्र.शा., मुंबई या कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, पो.नि. संदिप निगडे, पो.ह. संदिप सुकाळे, चिंतामण इरनक, पो.शि. धुळदेव कोळेकर, आदित्य जाधव, तसेच स.फौ. रमेश पासी यांनी बजावलेली आहे.
0 टिप्पण्या