Ticker

6/recent/ticker-posts

अपहरण करून लुबाडणूक करणाऱ्यांना अटक

मुंबई, दि. १५ : साकीनाका पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश करून दरोडाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तब्बल आठ जणांना अटक केली आहे. त्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ डिसेंबर ते ७ डिसेंबरच्या संध्याकाळी सात ते साडेबाराच्या दरम्यान पंजाबचे रहिवासी असलेले अभिषेक विपण कुमार आणि त्याचा भाऊ हिमांशू कुमार हे पश्चिम उपनगरातील साकीनाका परिसरातील एका हॉटेलजवळ अपहरणाचे बळी ठरले. त्यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला असता अटक केलेल्या संशयितांपैकी एकाने परदेशात नोकरीच्या सुरक्षेचे आश्वासन देऊन या दोघांना मुंबईत येण्यास सांगत फसविक्याचे आढळून आले आहे. एका अधिकाऱ्याने असे सांगितले की, साकीनाका पोलिसांनी आठ जणांना पकडण्यात यश मिळवले आहे ज्यांचा गुन्ह्याशी संबंध आहे.

आरोपींच्या कार्यपद्धतीमध्ये दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश सारख्या राज्यातील व्यक्तींना फसवण्याचा समावेश होता. विविध देशांमध्ये नोकरी आणि व्हिसा, सुरक्षेची आश्वासने, इमिग्रेशन अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा दावा करत त्यांनी हे प्रकार केले. लुटमरीच्या प्रकरणात त्यांचा सहभाग उघड झाला आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या