Ticker

6/recent/ticker-posts

व्यापाऱ्याला बांधून ठेवत चार कोटींची लूट

 पोलिसांनी अवघ्या ३० तासांत आरोपींना केली अटक


मुंबई, दि. १३ : काळबादेवी येथे व्यापारासह त्याच्या सहकाऱ्याला मारहाण करत चौकडीने त्यांचे हातपाय बांधले व त्यांच्याकडील चार कोटींची रोकड घेऊन पळ तेथून पळ काढला. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अवघ्या ३० तासांच्या आत सदर गुन्ह्याचा छडा लावून सहा जणांना नुकतीच अटक केली. हर्षद चेतनजी ठाकूर, राजूबा वाघेला, अशोकभा वाघेला, चरणभा वाघेला, मेहुलसिंग ढाबी आणि चिरागजी ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. माजी नोकरानेच दिलेल्या टीपवरून हा लुटीचा डाव असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून गुन्ह्यातील चार कोटींची रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी काळबादेवी येथील आदित्य हाईट्स रामवाडीतील केडियम इंटरप्राइजेस' मध्ये तक्रारदार व्यापारी कांतीभाई पटेल आणि त्यांचे सहकारी भरत ठाकूर हे आराम करत होते. यावेळी चौकडीने त्यांच्या घरात प्रवेश करत त्यांना मारहाण केली तसेच दोघांच्या हातपाय बांधून घरातील साडेचार कोटींची रोकड घेऊन ते पसार झाले.

घटनेची वर्दी लागताच लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास करे (गुन्हे) आणि तपास पथकाने शोध सुरू केला.


लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, पायधुनी पोलीस ठाणे, वी.पी. रोड पोलीस ठाणे या पोलीस ठाणेमधील अधिकाऱ्यांची विविध पथके तयार करून त्यांना जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. सीसीटीव्ही मध्ये आरोपी मास्क लावून खाली उतरताना दिसले. एका फुटेजमध्ये त्यांच्यासह वाहनाचा क्रमांक मिळून आला. पुढे हाच धागा पकडून वाहन तसेच मोबाईल क्रमांकाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. आरोपी संपूर्ण मालमत्तेसह गुजरातमध्ये पळून गेल्याचे समोर येतात पोलीस पथक गुजरातला रवाना झाले. त्यानुसार सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या