Ticker

6/recent/ticker-posts

प्रेम संबंधातून जन्मलेल्या बाळाला फेकले कचऱ्यात

मुंबई, दि. १२ : अविवाहित असताना प्रेम संबंधातून बाळ जन्माला आले म्हणून जन्मदात्या महिलेने नवजात बाळाला कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती सायन पोलिसांच्या तपासात समोर आली. याप्रकरणी सायन पोलिसांनी खातून उर्फ हिना खान (वय,२३) या महिलेला नुकतीच अटक केली आहे.


सफाई कामगार सरस्वती डोंगरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून दखल घेतली आहे. शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास रुग्णातील अपघात विभागातील शौचालयात कचरा गोळा करण्यासाठी त्या गेला असता त्यांना कचऱ्याची बादली जड वाटली म्हणून त्यांनी उघडून पाहत असता त्यातील काळ्या रंगाच्या पिशवीत एक अर्भक मिळून आले. त्यांनी तात्काळ याबाबत वरिष्ठांना कळविले. डॉक्टरने तात्काळ तेथे धाव घेऊन तपासणी केली असता त्या बाळाला मृत घोषित केले. कोणीतरी बाळ नको असल्याने तेथे फेकून दिले होते याच कारणातून बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तविण्यात आला होता. या प्रकरणी सीसीटीव्ही च्या मदतीने पोलिसांनी शोध घेतला असता एक महिला संशयास्पद वावरत असल्याचे आढळले. तोच धागा पकडून पोलिसांनी धारावातून हिना हिस ताब्यात घेतले. तिच्या चौकशीत अविवाहित असताना प्रेमसंबंधातून बाळाला जन्म दिला म्हणून तिनेच बाळाला फेकल्याचे पोलिसांना सांगितले. बाळाचा मृत्यू नेमका कधी आणि कसा झाला याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या