मुंबई, दि. ८ : मढ, एरंगळ येथील पाच अनधिकृत फिल्म स्टुडिओवर शुक्रवारपासून पालिकेने कारवाई सुरू केली. टप्प्याटप्प्याने हे स्टुडिओ जमीनदोस्त करण्यात येणार असून यासाठी पोकलेन व बुलडोझरचा वापर करण्यात येत आहे. बालाजी तिरुपती आणि एक्सप्रेशन हे दोन स्टुडिओ पी. उत्तर विभागाने शुक्रवारी सकाळी जमीनदोस्त केले. उर्वरित स्टुडिओंवर दोन दिवसांमध्ये कारवाई करण्यात येणार आहे.
मढ, एरंगळ येथे आणि अक्सा या ठिकाणी पाच बेकायदा स्टुडिओ उभारण्यात आले होते. यामध्ये चार स्टुडिओ हे बालाजी कंपनीचे तर एक स्टुडिओ एक्सप्रेशन कंपनीचा होता. या बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या बंगले धारकांचे धाबे दणाणले आहेत.
मढ, एरंगळ येथे आणि अक्सा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बंगले बांधण्यात आले आहेत. सुमारे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन उपयुक्त विजय काळम पाटील यांच्या नेतृत्वाखाली या बंगल्यावर कारवाई करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मढ व एरंगळ मधील बेकायदेशीर स्टुडिओ आणि बंगल्यांबाबत तक्रार केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा