बतावणीचा गुन्हात दोन आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस
मुंबई, दि,१०: दिनांक ०४ एप्रिल रोजी 23.50 वाजे चे सुमारास तक्रारदार हे जमात खाना समोर अंधेरी पश्चिम मुंबई येथून पायी त्यांचे राहते घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून एका लाल रंगाच्या मोटर सायकल वरून दोन अनोळखी इसमाने येऊन त्यांना त्यांच्याजवळ बोलून ते दोघे पोलीस असल्याची बतावणी करून आगे लफडा हुआ है और लपडा करने वाला इंसान आपके जैसा दिखता है असे बोलून फिर्यादी कडील असलेल्या सामानाची झडती घेऊन त्याच्या मधून रोख रक्कम ७०००/- हात चलाखीने काढून घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केली. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून डी एन नगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२३ कलम ४२०, १७०, ३४ भादवी. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त, डी एन नगर विभाग, श्री शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मिलिंद कुरडे व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री पठाण यांच्या सूचनेप्रमाणे सपोनि लोणकर व पथकाने नमूदचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करीत असताना घटनास्थळापासून 30 ते 35 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, एक संशयित लाल रंगाची मोटर सायकल व दोन अनोळखी इसम दिसून आले. सदर मोटरसायकल व संशयित इसमांचा शोध घेत असताना, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री पठाण यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली.
सदर माहितीच्या अनुषंगाने तात्काळ गुन्हे प्रकटीकरण अधिकारी लोणकर व पथकाने पोलीस निरीक्षक गुन्हे श्री पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगा मैदान, मेघवाडी, जोगेश्वरी पूर्व मुंबई येथे सापळा रचून सदर पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात अटक करून गुन्हा उघडकीस आणला.
मोहम्मद युसूफ सय्यद उर्फ मुन्नू व याकुब अब्दुल कादिर खान. उर्फ आलम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम रुपये ७०००/-, अंदाजे किंमत रुपये ५०,०००/- एक लाल रंगाची युनिकॉन मोटरसायकल क्रमांक MH 01 AF 7422 असे एकूण अंदाजे किंमत रुपये ५७,०००/- हस्तगत केले.
तपासी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग लोणकर, सपोनि पांडुरंग लोणकर, पोलीस ह. श्रीकांत कांबळे, रतन पाटील, मंगेश चव्हाण, पोलीस शिपाई मुकेश धर्माधिकारी, बजरंग भोसले, रणजीत महाडिक, सुमित पोळ, व राहुल चौधरी यांनी माननीय श्री शशिकांत माने, सहाय्यक पोलीस आयुक्त डी एन नगर विभाग मुंबई, श्री वाहिद पठाण, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला.
अशी माहिती दा.नौ. नगर, पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष श्री. मिलिंद कुरडे यांनी दिली आहे.
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा