२४ तासात बिहारमधून आरोपीला केली अटक
मुंबई, दादासाहेब येंधे : कांदिवलीतील एका व्यावसायिकाच्या घरात जवळपास अंदाजे ४१ लाख ५० हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी करून पळून गेलेल्या नोकराला नुकतीच कांदिवली पोलिसांनी अटक केली. श्रीकांत चिंतामणी यादव (वय, ३०) असे त्याचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. १२ वर्षे मालकाच्या घरी हाउसकीपिंगचे तो काम करीत होता.
विवेक भोळे हे तक्रारदार जे वास्तुविशारद अंधेरी येथे राहत असून एमआयडीसीच्या पिनॅकल बिजनेस पार्कमध्ये त्यांचे खाजगी कार्यालय आहे. काही महिन्यांपूर्वी विवेक भोळे यांच्या कपाटाच्या चाव्या हरवल्या होत्या. त्यांच्या पत्नीने श्रीकांतला दुसऱ्या चाव्या बनवून आणण्यास सांगितले होते. त्याने बनावट चाव्या बनवून त्यांना दिल्या आणि अचानक २४ ऑक्टोबर रोजी गावी जातो असे सांगून तो निघून गेला. दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी भोळे यांनी लॉकर उघडला असता दागिने व रोकड लॉकरमध्ये नसल्याचे त्यांना समजले.
दागिने गायब होणे आणि श्रीकांचे गावाला अचानक निघून जाणे विवेक भोळे लक्षात आल्यावर यादव याच्यावरील त्यांचा संशय बळावला. त्यांनी लागलीच कांदिवली पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी श्रीकांत यादवचा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर जाधव आणि पोलीस निरीक्षक दीपशिखा वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गीते, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत भिसे आणि पथकाने तांत्रिक तपास करत तो बिहारला निघून गेल्याची माहिती प्राप्त केली. त्यानुसार कांदिवली पोलीस पथक बिहारला पोहोचले. श्रीकांतच्या चौकशीत त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली व त्याला मुंबईत आणून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४६ लाख ८३ हजार ५४८ रुपयांचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
Press

0 टिप्पण्या