मंत्रालयात समूह राष्ट्रगीत गायन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

demo-image

मंत्रालयात समूह राष्ट्रगीत गायन

मुंबई, दि. १८ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्यात ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून या उपक्रमाअंतर्गत काल १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन राज्यभर करण्यात आले.

मंत्रालयातही मुख्य प्रवेशद्वार आणि त्रिमूर्ती प्रांगणात समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. समूह राष्ट्रगीत गायनात यावेळी मंत्रालयात नियुक्त करण्यात आलेले पोलीस पथक यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8-1



2291

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *