मुंबई दि. १८ : जीवन प्रबोधिनी ट्रस्ट, अधारिका फाउंडेशन आणि नन्हीं परी फाउंडेशन या तिन्ही संस्थाच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या श्रीमती कमला मेहता अंध विद्यालयात दृष्टिहीन मुलींसाठी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात अंताक्षरीने झाली. त्यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि शेवटी दहीहंडी उत्सव, जिथे अंध मुलींनी मानवी थर रचून उत्कृष्टरित्या हंडी फोडली.
व्हिडिओ पहा...👇
यावेळी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट व आधारिका फाउंडेशन तसेच नन्हीं परीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून हा सोहळा आनंददायी बनवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रसंगी आधारिका सदस्य उपस्थित होते. श्रीकांत राणे, विनायक मोरे, संतोष मेळेकर, उमेश घाडगे, अरुण सावंत, पारस शहा,सौ संगीता हिरभगत व जीवन प्रबोधीनी ट्रस्ट चे संस्थापक सत्यवान नर यांचे प्रतिनिधी प्रविण पावसकर, विजय काळे, दत्तात्रय माने, साहेबराव शिंदे, संदेश महाले संदीप सकपाळ, राजु राणे आणि गणेश पाथरे तसेच नन्हीं परी फाउंडेशनचे असिफ खान ओवेझ नेहल वाघेला यांनी उपस्थिती दर्शवली.
विशेष आभार
वर्षाताई जाधव ( प्राचार्य - कमला मेहता विद्यालय )
कार्यक्रमात विशेष उपस्थिती सौ स्वेता सरवणकर श्री सत्यवान नर यांची होती.
w
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा