Ticker

6/recent/ticker-posts

दहीहंड्या फुटल्या जल्लोषात

मुंबई : तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दहीहंडी उत्सव काल साजरा झाला. मुंबईत पावसाची सलामी नव्हती. तरीही गोविंदा उत्साहाने पुरते भिजून गेले होते. दहीहंड्या जल्लोषात फुटल्या. थरावर थर रचताना पाहताना मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकत होता. बोरवली, विलेपार्ले, दादर पासून ते अगदी गिरणगाव पर्यंत सगळीकडेच गल्लोगल्ली, रस्तोरस्ती दहीहंडी उत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. कुठे पारंपारिक दहीहंडी उत्सव साजरा होताना शिवाजी महाराज अवतरले, तर कुठे महिला गोविंदा पथकेही दहीहंडी फोडण्यात आघाडीवर होत्या. काही ठिकाणी या पथकांनी चार थर लावून सलामी दिल्या. तर काही ठिकाणी सात थरांच्या थरथराटात हंड्या फोडून जल्लोषही केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या