मुंबई, दि.२० : मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातील राहणा-या सोन्याचे उपचारादरम्यान नुकतेच निधन झाले राणा सात वर्ष सात महिन्यांचा होता.
स्फोटके शोधण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जानेवारी २०१६ साली लॅब्रोडोर जातीचे श्वान असलेला 'राणा' मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल झाला होता. तेव्हापासून राणा याने बॉम्बकॉल, थ्रेट कॉल, संशयित वस्तूंची तपासणी करणे, व्हीव्हीआयपी, व्हीआयपी यांचे मुंबई भेटीदरम्यान घातपातविरोधी तपासणी करणे, मर्मस्थळे यंची नियमित तपासणी करणे इत्यादी घातपात विरोधी तपासणीमध्ये यशस्वीरित्या सहभाग घेतलेला आहे. राणा याला पोटाचा विकार झाल्याने त्याच्यावर परळ येथील बाई साखराबाई पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच मंगळवारी राणा चे निधन झाले. राणावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा