मुंबई, दि. १२ : काल (११/०८/२०२२) रोजी दुपारी १२.५० ते १३.४० वा.चे दरम्यान सीएसएमटी रेल्वे स्थानक व टर्मिनस येथे अंजुमन इस्लाम हायस्कूल यांच्या RSP च्या विद्यार्थी व शालेय बँड पथक यांच्या वतीने पोलीसां समवेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च आयोजित करण्यात आला.
विडिओ पहा...👇
सदर राष्ट्रध्वज प्रसार व प्रचार फेरी करीता अंजुमन इस्लाम हाय स्कूल चे ७२ विद्यार्थी व ०३ शिक्षक वर्ग उपस्थित होते. तसेच इकडील पोलीस ठाणेचे पोनि/प्रदीप साळुंके, पोलीस उप निरीक्षक तानाजी भांडवलकर, स्टेशन प्रबंधक श्री. परब, ०६ महिला पोलीस अंमलदार व ०५ पुरुष पोलीस अंमलदार उपस्थित होते.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त हर घर तिरंगा या संकल्पनेबाबत अवगत करून स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी प्रोत्साहित करून भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते - अजाणतेपणे राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घेणे बाबत जाणीव प्रचार व प्रसार फेरी द्वारे जणजागृती करण्यात आली.
सदर प्रचार व प्रसार फेरी पोलीस ठाणे समोरून सुरु होऊन सीएसएमटी लोकल लाईन, जनरल हॉल, मेन लाईन, DRM कार्यालय, धन्यवाद गेट मार्गे फिरून पुन्हा पोलीस ठाणे समोर प्रचार व प्रसार फेरी समाप्त करण्यात आली.
तसेच रेल्वे प्रवासादरम्यान संशयीत इसम, बेवारस बॅग, चोर ई. दिसल्यास त्याची माहिती ड्युटीवरील पोलिसांना अथवा रेल्वे पोलीस हेल्प लाईन १५१२ येथे फोन द्वारे माहिती द्यावी. तसेच सतर्क राहण्या बाबत प्रवश्यामध्ये जनजागृती करण्यात आली.
सदर विद्यार्थी यांच्या बँड वादन व मार्च पास ला तसेच प्रचार व प्रसार फेरीला रेल्वे प्रवासी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. ए. इनामदार यांनी दिली आहे.
Grp
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा