नायजेरियन एमडी व कोकेनसह पकडला - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, १९ एप्रिल, २०२२

demo-image

नायजेरियन एमडी व कोकेनसह पकडला

मुंबई :  नायजेरियन ड्ग्जमाफिया एमडी आणि कोकेनचा साठा विकण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा युनिट-१० च्या पथकाने त्याला पकडले. आलिवर निबी असे त्या नायजेरियन व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडे ३० लाख २० हजार किमतीचा एमडी व कोकेन ड्रग्सचा साठा आढळला.

3

युनिट-१० चे वरिष्ठ निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्त घालत असताना अंधेरी पश्चिमेकडील गणेशनगर परिसरात एक नायजेरियन नागरिक संशयास्पद हालचाल करताना पथकाच्या नजरेस पडला. त्याच्या हातात पिशवी होती आणि तो कोणाची तरी वाट पाहत होता. त्यामुळे पोलीस पथक त्याच्याजवळ गेले असता पोलिसांना पाहताच तो तेथून पळू लागला. पोलिसांनी शिताफीने त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता २०० ग्रॅम एमडी आणि ३४ ग्रॅम कोकेन असा एकूण ३० लाख २० हजार किमतीचा ड्रग्ज साठा निबीजवळ सापडला. हे ड्रग्ज तो कोणाला विकणार होता याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.












Press%20Note%20M.D_page-0001




















Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *