मुंबई पोलीस आयुक्त
मुंबई: पासपोर्ट वेरिफिकेशनसाठी काही अपवाद वगळता मुंबईकरांना पोलीस ठाण्यात बोलावले जाऊ नये असे ट्विट शनिवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केले. त्यावर इतक्या झटपट बदलांची सवय आम्हाला नाही असे सांगत 'थोडा सास तो लेने दो सर' अशा शब्दात नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.
शनिवारी दुपारी पांडे यांनी हे ट्विट केले. ज्यात '#पासपोर्ट पडताळणी आम्ही निर्णय घेतला आहे की कागदपत्रे अपूर्ण असणे इत्यादी अपवादात्मक प्रकरणाशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावले जाणार नाही. तसे घडल्यास त्याची मला तक्रार करा' असे ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे. पांडे यांच्या ट्वीटनंतर मग अधिकाऱ्यांसमोर कागदपत्रांसह हजर न राहता पडताळणी कशी होणार असा सवाल एका युझरने आयुक्तांना केला. त्यावर पोलिस कर्मचारी स्वतः तुमच्या घरी येईल. जर कागदपत्रात काही तफावत असेल तर त्याच्या पूर्ततेसाठी तुम्हाला फोन येईल असे उत्तर पांडे यांनी दिले.
0 टिप्पण्या