पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आपत्कालीन घटनांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी दुपारी कुर्ला पश्चिमेकडील राम मनोहर लोहिया मार्गावरील हायटेक परिसरात इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाला मृतांमध्ये पाच वर्षे लहान मुलाचा समावेश असून अफान खान असे त्याचे नाव आहे.
व्हिडिओ पहा...👇
मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी कुर्ला पश्चिमेकडील विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याच्या परिसरात तळमजला अधिक म्हाडाच्या एक मजली बांधकाम असलेल्या घराचा सज्जाचा काही भाग कोसळला.
दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दल, मुंबई महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली. या दुर्घटनेत एकूण चार जण जखमी झाले. त्या जखमींपैकी तिघांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमींपैकी पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर रफिक शेख आणि इरफान खान यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुर्ला येथील भाभा रुग्णालयात सहा वर्षीय मोहम्मद जिकरान या चौथ्या जखमीवर उपचार सुरू आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा