मुंबई : महाशिवरात्रीचे औचित्य साधून जुहु समुद्रकिनारी वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी भगवान शंकराचे वाळू शिल्प साकारले आहे.
लक्ष्मी गौड या गेल्या कित्येक वर्षांपासून जुहू किनारी वाळूशिल्प बनवत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती बनवल्या आहेत. गेल्यावर्षी महाशिवरात्रीला त्यांनी बारा शिवलिंगांचे वाळूशिल्प साकारले होते. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे आदियोगी शिवशंकराची भव्य दिव्य प्रतिमा आहे. या संकल्पनेवर लक्ष्मी गौड यांनी यंदा वाळूशिल्प बनवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा