उद्यापासून मुंबईत १ ली ते ७ वीच्या शाळा सुरू - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

demo-image

उद्यापासून मुंबईत १ ली ते ७ वीच्या शाळा सुरू

मुंबई : उद्या (१५ डिसेंबर) पासून मुंबईत इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होत आहेत. कोविड विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने या संदर्भात माध्यम परिपत्रक काढण्यात आलेले आहे.'महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक २४ सप्टेंबर २०२१ ला अनुसरून आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मंजुरीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा, परिपत्रक क्र. ईओजी/१७२७ दि. २९ सप्टेंबर २०२१ अन्वये ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात आलेल्या आहेत.'

तसेच, 'महाराष्ट्र शासन परिपत्रक दि. २९ नोव्हेंबर २०२१ ला अनुसरून आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मंजुरीने बृहन्मुंबई क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा, परिपत्रक क्र ईओजी/२२३४ दि. ३० नोव्हेंबर २०२१ अन्वये दिनांक १५ डिसेंबर २०२१पासून कोविड विषयक सूचनांचे पालन करून सुरू करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच परिपत्रक क्र.ईओजी/१२२ दि.०८ डिसेंबर २०२१ अन्वये अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार १५ डिसेंबर २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होत आहेत.' असं परिपत्रकात नमूद आहे. तसेच ट्वीट करून महापालिकेने उद्यपासून शाळा सुरू करण्याची माहिती दिली आहे.




.com/img/a/





.com/img/a/

.com/img/a/










Photo : bmc viral letter

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *