Ticker

6/recent/ticker-posts

अंधेरीत लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

मुंबई : मुंबईत लिफ्ट कोसळून होणार्‍या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून सोमवारी अंधेरी पूर्वेतील गुंदवली परिसरात १६ मजली 'एसआरए' इमारतीत दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास दहाव्या मजल्यावरून लिफ्ट अचानक कोसळली. या दुर्घटनेत तीन मुले आणि दोन महिला असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील १४ वर्षाच्या मुलांची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या