मांजरीच्या आवाजामुळे बलिकेचा जीव वाचला; पोलिसांनी दिले जीवदान
मुंबई, दादासाहेब येंधे : पंतनगर पोलिसांनी एका नवजात बालिकेला जीवदान देण्याचे काम केले आहे. एका निर्दयी मातेने आपल्या पोटच्या मुलीला कपड्यात गुंडाळून रात्रीचा फायदा घेत गटारात फेकले होते. हा प्रकार कळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या चिमुकलीला आपल्या ताब्यात घेतले. त्या चिमुकलीचे सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पूर्व प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला आणि रमाबाई कॉलनीतील एका नाल्यात नवजात बालिका असल्याची माहिती देण्यात आली. नियंत्रण कक्षाकडून ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी निर्भया पथकासह घटनास्थळी लगेच धाव घेतली. तेव्हा नाल्यामध्ये कपड्यात गुंडाळलेली गोंडस चिमुकली सापडली. आईचा विरह आणि उघड्यावर फेकले असल्याने त्या चिमुकलीचे रडून बेहाल झाले होते. महिला अंमलदार सोनावणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच त्या चिमुकलीला ताब्यात घेऊन तिला मायेची ऊब दिली. पोलिसांनी तात्काळ चिमुकलीला राजावाडी रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार सुरू केले. सध्या राजावाडी रुग्णालयात मुलीचे देखभाल केली जात असून पोलिस तिच्या मातेचा शोध घेत आहेत.
लहान चिमुकलीला नाल्यात फेकल्याचे कोणालाही समजले नाही. पण, काही वेळानंतर तेथे आलेले एक मांजर त्या चिमुकलीला बघून मोठमोठ्याने ओरडू लागले. मांजराचे ओरडणे ऐकून तेथे राहणारे सुरेंद्र रणपिसे घराबाहेर आले. मांजर का ओरडते ते पाहिले असता कपड्यात गुंडाळलेले बाळ रणपिसे यांना दिसले. त्यामुळे लगेचच रणपिसे यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधून ही माहिती दिली.
Mumbai Police save new born baby.
प्रेस नोट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा