मुंबई : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने यंदाची दिवाळी निर्बंध मुक्त वातावरणात साजरी होणार आहे. मागील वर्षी कोरोना नियमांमुळे अनेकांनी खरेदीसाठी हात आखडता घेतला होता. परंतु यंदा मात्र, खरेदीसाठी आतापासून सर्वत्र झुंबड उडत आहे. आकर्षक कंदीलांपासून फटाक्यांच्या खरेदीकरिता नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे. बाजारात देखील विविध रंगांचे कंदील लक्ष वेधून घेत आहे.
0 टिप्पण्या