देशभक्तीपर गीते सादर करून शहीद पोलीसांना आदरांजली
मुंबई, दादासाहेब येंधे : पोलीस स्मृतीदिनानिमित्त सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यासमोरील मोकळ्या जागेत घाटकोपरच्या रेल्वे पोलिसांचे बँडपथकाने देशभक्तीपर गाण्याचा कार्यक्रम सादर केला.
यावेळी शहीद पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत केंदे, अनंत नाईक, राजन नाईक, विजय पाटील, अनिल थोपटे, भूषण म्हात्रे, सुनील मिसळ या रेल्वे पोलिसांच्या बँड पथकाने सुंदर कार्यक्रम सादर केला. यावेळी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत तसेच पोलीस निरीक्षक भगवान डांगे आदी उपस्थित होते. यावेळी स्थानकातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनीदेखील कार्यक्रमाचा लाभ घेतला. काही जणांनी तर बँड पथकासोबत सेल्फी काढला तर काही प्रवाशांना आपल्या मोबाइलमध्ये कार्यक्रमाचा व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही.
0 टिप्पण्या