Ticker

6/recent/ticker-posts

उंच इमारती बांधताना अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक -आदित्य ठाकरे

मुंबई : मुंबईतील करी रोड येथील अविघ्न पार्क या इमारतीला लागलेली आग विझवताना होणाऱ्या स्प्रिंकलर मधून पाणी कमी प्रमाणात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याठिकाणी पाण्याचा दाब कमी का होता याची चौकशी केली जाईल अशी माहिती पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. इमारती बनवताना त्यामध्ये अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

करी रोड येथील अविघ्न पार्क या इमारतीमध्ये १९ व्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी  ११ च्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाला. अरुण तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून तो तीस वर्षाचा होता. घटनास्थळी आदित्य ठाकरे यांनी दुपारी भेट दिली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना इमारतीला लागलेली आग ही दुर्दैवी घटना आहे, आग का, लागली काही कमी होते का? याची चौकशी केली जाईल. चौकशीनंतर चूक कोणाची आहे हे कळल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या